नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर स्वीकारला पदभार
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील करगाव येथील लोकनेते काकासाहेब जी.जी.चव्हाण माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकपदी कवी मनोहर नामदेव आंधळे यांना १ जून २०२५ रोजी सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जी.जी.चव्हाण, चिटणीस राजेश वाडीलाल राठोड यांच्या स्वाक्षरीनिशी नियुक्ती आदेश देऊन श्री.आंधळे यांनी पदभार स्वीकारला आहे. नियत वयोमानानुसार ३१ मे २०२५ रोजी मुख्याध्यापक बिलाल सकावत शेख हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी संस्थेतील सेवा ज्येष्ठतेनुसार १ जूनपासून मनोहर आंधळे यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करून त्यांना हा पदभार सोपविला आहे.
यांनी केले कौतुक
याबद्दल सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जी.जी.चव्हाण, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, चिटणीस राजेश राठोड, संचालक योगेश सुभाष चव्हाण यांच्यासह संस्थेचे प्रशासकीय कामकाज अधिकारी मधुकर बागुल, सेवानिवृत्त प्राचार्य आर.बी.उगले, बी.पी.पाटील, व्ही.आर.बोरसे, प्राचार्य सी.डी.पाटील, करगाव प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश राठोड, पिंपरखेड तांडा येथील मुख्याध्यापिका मिना बागुल, राजदेहरे आ.शा.चे मुख्याध्यापक एम.बी.चव्हाण तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा चाळीसगावचे अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, शिवाजी साळुंखे, विश्वस्त मंडळ अध्यक्ष डॉ.सुनील राजपूत, कार्यकारी विश्वस्त किसनराव जोर्वेकर आदी मान्यवरांनी कवी आंधळे यांचे कौतुक केले आहे.