कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यासह जीवन कार्यावर टाकला प्रकाश

0
7

संत मुक्ताबाई महाविद्यालयात लेवा गणबोली दिन साजरा

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी 

येथील संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त लेवा गण बोली दिन साजरा करण्यात आला. कवित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर व जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील होते.

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने लेवा गणबोली दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला डॉ.संदीप माळी म्हणाले की, बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे आहे. भाषा, समाज आणि संस्कृती हे घटक देशाला एका सामाजिक धाग्यामध्ये बांधून ठेवणारे आहेत. विविध कला ह्या मानवी जीवनाच्या छटा व्यक्त करणाऱ्या आहेत. त्यातून एकसंघतेची भावना निर्माण केली जाते. हे कार्य कवयित्री बहिणाबाईंनी आपल्या काव्याच्या माध्यमातून लेवा गणबोलीच्या रूपाने समाजाला दिली. म्हणून त्यांचे कार्य हे समाजाला प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील म्हणाले की, बहिणाबाई चौधरी यांच्या प्रगल्भ विचारधारेमुळे समाजात नीतिमान समाज निर्माण करण्याची प्रेरणा आजच्या तरुण पिढीला मिळालेली ही एक दैवी देणगी आहे. प्रापंचिक जीवनातील विविध पेच प्रसंगावर अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत भाष्य केले आहे. बहिणाबाईंचे साहित्य विशेषता त्यांच्या मातृभाषेवर अवलंबून आहे. बहिणाबाईंच्या कवितांचे बहुतांश विषय हे कृषी संस्कृती व विविध सणसमारंभ तसेच मनोविश्लेषण करणाऱ्या वास्तवादी आहेत. स्त्री जीवनाच्या आणि स्त्री मनाच्या व त्यांच्या भावभावनांचे विश्लेषण करणारी कविता खऱ्या अर्थाने बहिणाबाईंनी आपल्या साहित्यात मांडली. म्हणून बहिणाबाईंना खान्देश कन्या म्हणून गौरविले आहे.

यांची लाभली उपस्थिती

कार्यक्रमाला डॉ. वीरेंद्र जाधव, डॉ. पंचशीला वाघमारे, प्रा. विशाल धुंदे, प्रा. कौस्तुभ शिंदे, श्री आर. सी. पाटील, प्रा. अमर पाटील, प्रा. शुभम पाटील, प्रा. प्रकाश खिलारे, प्रा. प्रणित चंदनशिवे, प्रा. काजल नारखेडे, प्रा. मोनाली पाटील, प्रा. नीलंबरी पाटील, प्रा. अंकिता झांबरे, प्रा. तेजस्विनी पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. भावना गोराणे, प्रा. आरती शिरतुरे, महाविद्यालयातील विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. रमेश शेवाळे, सूत्रसंचालन तथाआभार प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here