Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख
    जळगाव

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    saimatBy saimatMarch 22, 2026Updated:March 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ८,९३१ दिवस सत्तेवर; पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडीत काढला; डिजिटल आणि राजकीय वर्चस्व कायम

    साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे ‘सर्वाधिक काळ प्रमुख’ म्हणून पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. सत्तेच्या सर्वोच्च पदावर त्यांचे ८,९३१ दिवस पूर्ण झाले आहेत.

    मोदींच्या या कामगिरीमुळे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग (८,९३० दिवस) यांचा विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान असा दोन्ही कार्यकाळ मिळून मोदींनी हा टप्पा गाठला असून, त्यांनी सत्ताप्रमुख म्हणून २५व्या वर्षात पदार्पण केले आहे.

    मोदींच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण विक्रम नोंदले गेले आहेत. ते गुजरातचे सर्वाधिक काळ सेवा देणारे मुख्यमंत्री आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत आणि २०१४, २०१९, २०२४ अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून त्यांनी आपले राजकीय वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

    गुजरातचे नेतृत्व त्यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी स्वीकारले आणि सलग १३ वर्षे राज्याचे नेतृत्व केले. २१ मे २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर २६ मे २०१४ रोजी भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पूर्ण बहुमतासह सत्तेत येणारे ते पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले आणि सलग तीन कार्यकाळ पूर्ण केले.

    डिजिटल विश्वातही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता लक्षणीय आहे. YouTube चॅनेलवर ३० दशलक्ष सबस्क्राइबर्स, Instagram वर १०.१ कोटी आणि X (Twitter) वर १०.६ कोटी फॉलोअर्ससह त्यांनी जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Maharashtra Weather : महाराष्ट्रावर दुहेरी हवामान संकट; 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, 5 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026

    Chop : घरगुती त्रासाचा फटका भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केला

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.