गो.से.हायस्कुलमध्येे प्लास्टिक मुक्त अभियान

0
8

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कुल येथे इयत्ता सहावीच्या पाठातील ‘मले बाजाराला जायचं बाई’ पथनाट्य पाठात प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे गटारी तुडुंब भरतात, ते खाऊन जनावरे, जलचरे मरतात, शेतात पीक येत नाही ही सत्य परिस्थिती पाठातील स्त्री मांडत आहे. तोच संदर्भ घेऊन सहावीच्या वर्गशिक्षिका, चित्रकला शिक्षिका जे. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, विशेषतः टाकाऊपासून टिकाऊ पिशव्या तयार करून घेतल्या.

विद्यार्थ्यांना पर्यावरण वाचविण्यासाठी मोलाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा अनुभव आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम.वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील, चित्रकला शिक्षक सुबोध कांतायन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here