साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भुजल अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील तीस शाळांना वृक्षदिंडी उपक्रमाअंतर्गत प्रति शाळा पन्नास झाडे लावण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प व भुजल अभियानाचे गुणवंत दादा आणि सुचित्रा पाटील यांच्या प्रयत्नातून परमहंस हरीगीरीबाबा समाधी संस्थान परिसरात १००० बांबूचे वृक्ष लागवडीसाठी देण्यात आले. बांबूचे रोपण चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सुचित्रा पाटील, मा.नगरसेवक नितीन पाटील, पर्यावरण व जलमित्र सोमनाथ माळी, ॲड. शिवाजी बाविस्कर, विरेंद्रसिंग राजपूत, सरदारसिंग राजपूत, राकेश चव्हाण, विलास चव्हाण, अनिल वराडे, संभा राजपूत, निलेश सोनार, राहुल कोळी, धर्मा बच्छे, मुक्तानंद संत्संग मंडळाचे किशोर वर्मा, पवन शिनकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.