साईमत जळगाव प्रतिनिधी
जागतिक पर्यावरणदनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे येथील जिल्हा न्यायालय आवार, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, बस स्टॅण्ड आणि रेल्वेस्टेशन या ठिकाणी वृक्षारोपण पार पडले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्लीन ग्रुप जळगावचे मदन लाठी, हेमंत बेलसरे, सुजाता देशपांडे, माधुरी कुळकर्णी, जैन स्पोर्ट्स अकादमीचे शेख, वसंत पाटील, रवि नेटके, आदी आणि वकील वर्ग उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख साहेब, एस.पी. सैय्यद सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सुरेंद्र काबरा, जिल्हा सरकारी वकील यांचे हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी श्री. माळी ॲडमीन मॅनेजर, एस.एन. पाटील अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, श्री. अविनाश कुळकर्णी, वरीष्ठ लिपीक श्री. प्रमोद ठाकरे, गणेश निंबोळकर, हर्षल नेरपगारे, कु. दिपशीखा साखला, कु. जयश्री पाटील (कनिष्ठ लिपीक, प्रकाश काजवे शिपाई), रोहिणी विष्णू थोरात (राऊंड फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री, आर. पी. पाटील निवृत्त वनाधिकारी, डॉ. महेंद्र काबरा आदी होते.
पोलीस अधीक्षक कार्यालय
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे मार्गदर्शनानें होम डीवायएसपी संदीप गावीत आणि राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मंगल पवार, आरएसआयडीआय रज्जाक सय्यद, दीपक पाटील, कलीम काझी सहाय्यक पीएसआय उपस्थित होते.
जळगाव रेल्वेस्टेशन
रेल्वे स्टेशन बाहेरील प्रांगणात स्टेशन मॅनेजर ए. एम. अग्रवाल, बी. एस. गायकवाड, सब इन्स्पेक्टर रेल्वे सुरक्षा बल व सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी रोहिणी थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्रीमती अंजली पाटील कार्यालयीन अधीक्षक, यू. जे. कपोते मुख्य पार्सल सुपरवायझर, विश्वास पाटील बुकिंग सुपरवायझर, श्रीमती सुनंदा चौधरी मुख्य रिझर्वेशन सुपरवायझर, कांतीलाल कानडे, इंगळे आणि रेल्वेचे अधिकारी वर्ग होते.