Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : पिंप्राळा स्मशानभूमीत ५० झाडांचे रोपण नागरिकांसाठी सिमेंट बेंचचे लोकार्पण
    जळगाव

    Jalgaon : पिंप्राळा स्मशानभूमीत ५० झाडांचे रोपण नागरिकांसाठी सिमेंट बेंचचे लोकार्पण

    saimatBy saimatMarch 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Plantation of 50 trees at Pimprala cemetery, dedication of cement benches for citizens
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    स्व. मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ पिंप्राळा स्मशानभूमीत वृक्षारोपणनागरिकांसाठी सिमेंट बेंचचे लोकार्पण

    साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी

    पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगाव शहरातील पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ नगरसेवक अमर जैन यांच्या सौजन्याने तसेच भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशन व जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरात वृक्षारोपणासह नागरिकांसाठी सिमेंट बेंचचेही लोकार्पण करण्यात आले.

    स्मशानभूमी परिसर हरित आणि स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशनतर्फे सुमारे ५० झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. या रोपांचे मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आले. वृक्षारोपणामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

    या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी जळगावच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक सुरेश सोनवणे, नगरसेवक अमर जैन तसेच जाकीर खान यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

    याच प्रसंगी स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी सोयीस्कर ठराव्यात या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सिमेंट बेंचचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना काही काळ विश्रांती घेण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

    कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. शहरात हरित पट्टा वाढविण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.