Pimpri Budruk Truck Motorcycle : पिंपरी बुद्रुकला ट्रकची दुचाकीला धडक : एक ठार, दुसरा जखमी

0
16

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने एका दुचाकी वाहनास धडक दिली. त्यात पिंपरी बुद्रुक येथील महंत प्रियरंजनदास गुरु आचार्य महान साहेब (वय ३५) हे जागेवर ठार तर प्रवीण नारायण पाटील (वय २३) हे जखमी झाले आहे. त्यांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.रास्ता रोको करणाऱ्या नागरिकांना तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी समजूत काढून वाहतूक सुरळीत केली.

घटनास्थळी यापूर्वीही अनेकवेळा गंभीर अपघात घडलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी यापूर्वी नॅशनल हायवे ऑफ इंडियाचे प्रकल्प अधिकारी यांना वारंवार स्पीड ब्रेकर, समांतर रस्ते तयार करण्यासंदर्भात निवेदन दिलेली आहे. तथापि, त्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. याबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळावरून प्रकल्प अधिकारी श्री.साळुंखे यांच्याशी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.तसेच ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात सूचित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here