पिंपळगाव कमानीतील अग्नीवीर संकेत चव्हाण, होमगार्ड ईश्वर राठोड यांच्या निवडीबद्दल सत्कार

0
3

जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम

साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी

येथून जवळील पिंपळगाव कमानी (तांडा) येथील नवयुवक तरुण संकेत तुकाराम चव्हाण याची देशाच्या संरक्षणासाठी ‘अग्नीवीर’ पदावर आणि ईश्वर गणेश राठोड याची महाराष्ट्र गृहरक्षक दल (होमगार्ड) पदी निवड झाल्याबद्दल जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सेवालाल महाराज व आई जगदंबा मंदिर सभागृहात सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आला.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक-बाबुराव चव्हाण, भवरलाल चव्हाण, जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक चव्हाण, पोलीस पाटील तथा संस्थेचे उपाध्यक्ष इंदल चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद चव्हाण, उपसरपंच तथा संस्थेचे संचालक संदीप राठोड, ग्रामपंचायत सदस्य कैलास चव्हाण, संस्थेचे संचालक गणेश राठोड, तुकाराम चव्हाण, गोकुळ राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

गावातील सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या होतकरु नवयुवकांना संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले. गावातील सर्व तरुणांनी विविध स्पर्धेच्या परीक्षांमध्ये परिश्रम घ्यावे. त्यात त्यांनी नेहमी असेच पुढे जात रहावे, अशा तरुणांना संस्थेच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे पोलीस पाटील तथा संस्थेचे उपाध्यक्ष इंदल चव्हाण यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला गावातील नागरिक लालचंद चव्हाण, गोविंदा चव्हाण, विजय चव्हाण, मलखाण राठोड, ग्रामपंचायतीचे शिपाई बालचंद चव्हाण, बाळू चव्हाण, पिंटू चव्हाण, सचिन चव्हाण, उमेश चव्हाण, अमोल चव्हाण, कृष्णा राठोड, सेवालाल महाराज पुजारी राजाराम चव्हाण यांच्यासह गावातील असंख्य समाजबांधव, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here