‘पिकलबॉल’चा विद्यापीठाच्या खेळांसह ऑलिंपिकमध्ये समावेश व्हावा

0
8

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक भूपेंद्र पोळ यांनी चोपड्यासारख्या भागात पिकलबॉल खेळ प्रथमतः आणला. त्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. पिकलबॉल खेळाचा विद्यापीठ खेळांमध्ये तसेच ऑलिंपिक खेळांमध्ये समावेश व्हावा. या खेळातून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकविता येते, ही महत्त्वाची गोष्ट खेळाडूंनी लक्षात घ्यायला हवी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी खेळातील यशस्वी खेळाडू यांना नॅट फाउंडेशन, मुंबई आणि सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्यातर्फे प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयात नॅट फाउंडेशन, मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिकलबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. यावेळी नॅट फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी चेतन सनील, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, उपप्राचार्य ए. एन. बोरसे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक भूपेंद्र पोळ उपस्थित होते.

याप्रसंगी नॅट फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे वर्षा चौधरी, सनी पाटील, अभिषेक वाघ, भूषण बाविस्कर, उज्ज्वला गद्रे या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारून क्रीडाविषयक कामगिरीसाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी स्नेहल पाटील, भूपेंद्र पोळ, रोहित पाटील, अंजली पोळ, जीनिशा क्षीरसागर या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पिकलबॉल स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना तसेच प्राध्यापकांना टी शर्ट देऊन नॅट फाउंडेशन, मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्यातर्फे गौरविण्यात आले. याप्रसंगी अभिषेक वाघ, नर्मदानंद चौधरी, एलिना साळवी, कलश क्षीरसागर या विद्यार्थ्यांचा पिकलबॉल किट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नॅट फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी चेतन सनील म्हणाले की, पिकलबॉल खेळाला उज्ज्वल भविष्य आहे. खेळाडूंनी हा खेळ नेहमी खेळून त्याचा सराव करावा. चोपड्यातील पिकलबॉल खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे, ही अतिशय गौरवाची बाब आहे. चोपड्यासारख्या ग्रामीण भागात पिकलबॉल खेळासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा खेळाडूंनी फायदा घ्यायला हवा. आमच्या संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले जाते. तसेच चोपड्यासारख्या ग्रामीण भागातील खेळाडूसाठी आर्थिक योगदान देण्याचे त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यशस्वी खेळाडू, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एल. बी. पटले तर आभार प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here