साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरातील मुख्य रस्ता त्यासह परिसरातील रस्त्याची गेल्या चार वर्षांपासून समस्या निर्माण झाली होती. यासाठी येथील नागरिकांनी इंद्रप्रस्थ नगर येथून मोर्चा काढून एस . के . ऑईल मिल जवळील मुख्य चौकात रस्ता रोको करून महापालिका प्रशासनाचा व नगरसेवकांचा निषेध नोंदविला.
सविस्तर वृत्त असे कि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरात रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागिरकांनी नेहमी महापौर व आयुक्त याना निवेदन व त्याचा पाठपुरावा हि केला परंतु कुठलेही नियोजन मनपा प्रशासन करीत नसल्याने नागरिकांनी एकत्र येऊन हा रास्ता रोको आंदोलन करण्यास मनपा प्रशासनाने भाग पाडले. यावेळी रास्ता रोको सुरु असतात घटनास्थळी शहर पोलीस पथकही दाखल झाले होते. यावेळी नागरिकांच्या संतप्त भावना पोलीस प्रशासनाने एकूण घेतल्या त्यानंतर महापौर जयश्री ताई महाजन हे आंदोलनस्थळी दाखल होत आश्वासन देत हे आंदोलन तूर्तास मागे घेण्याचे सांगितले.
महापौर महाजन यांचा ठेकेदाराला फोन बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेले उड्डाण पुलासंदर्भांत नागरिकांनी महापौर महाजन याना विचारले असता महापौर यांनी लागलीच ठेकेदाराला फोन करून हे काम लागलीच सुरु करण्याची विनंती केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या भावना शांत झाल्या.
हे आंदोलन थांबल्यानंतर महापौर महाजन यांनी प्रभागातील संपूर्ण भागाची पाहणी केली असता के.सी पार्क परिसरातील नागरिकांनी महापौरांना घेराव घातला होता.
यांनी केले आंदोलन
आकाश जाधव, विजय सुरवाडे, संदीप महाले, दीपक झुझारराव, नितीन मोरे, अतुल शिरसाळे, स्वामी पोतदार, महेश ठाकूर, अमर लोखंडे, नारायण कोळी, कुमार निकम, राजू मोरे, बंटी सोनवणे, भूषण राऊत , लक्षिमकांत तिवारी, चंद्रमणी मोरे यांच्यासह परिसरातील शेकडो जबाबदार नागरिक उपस्थित होते.