मेष-
आजच्या दिवशी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करा. तसंच आर्थिक स्थिती अनुकूल राहील. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
वृषभ-
तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे पार पाडा. आजच्या दिवशी गरजू मित्राला मदत करा, दुपारची वेळ चांगली आहे.
मिथुन-
आजच्या दिवशी दुपारपर्यंत समस्या सुटतील. त्याचप्रमाणे घाईघाईत कोणताही निष्काळजीपणा करू नका. मोठ्यांचा आदर करा.
कर्क-
आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका. तसंच घरात पाहुणे येण्याचा योग आहे. त्याचशिवाय तुमचा निर्णय काळजीपूर्वक घ्या.
सिंह-
आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका. व्यवसायामध्ये मोठा नफा मिळणार आहे. आज इतरांकजून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
कन्या-
नातेससंबंधात कडवटपणा येण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत जागत बसू नका. तुमची स्वाक्षरीचा विचारपूर्वक करा.
तूळ-
आजच्या दिवशी एखाद्या स्त्रीकडून मदत मिळेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा. मोठ्यांचा आदर करा. मोठे निर्णय पुढे ढकलावे.
वृश्चिक-
आजच्या दिवशी नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. घराची पूर्व बाजू स्वच्छ ठेवा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
धनु-
आजच्या दिवशी तुम्ही घेत असलेल्या आहाराची काळजी घ्यावी. करियरमध्ये कोणतेही बदल करू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
मकर-
आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा. वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा.
कुंभ-
आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. तसंच आज कोणाशीही वाद घालू नका. तुमचं गुपित कोणाशी शेअर करू नका.
मीन-
वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. गोड फळ दान करा. कोणालाही वाईट सल्ला देऊ नका.