Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Shivkalni Chowk : शिवकॉलनी चौकातील अपघातात पादचाऱ्याला चिरडले
    जळगाव

    Shivkalni Chowk : शिवकॉलनी चौकातील अपघातात पादचाऱ्याला चिरडले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 1, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मृतात धरणगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा समावेश : नागरिकांचा संताप

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील शिवकॉलनी चौकात रविवारी, १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातात धरणगाव येथील तहसील कार्यालयात कार्यरत शिपायाचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

    सविस्तर असे की, मयत विशाल रमेश सोनार (वय ४४) हे रविवारी दुपारी शिवकॉलनी चौकात रस्ता ओलांडत असताना खोटेनगरकडून येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात त्यांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पथक तातडीने दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. दरम्यान, वाहन चालकाने घटनास्थळाहून पळ काढला असल्याचे सांगण्यात आले.

    शिवकॉलनी चौक ठरतोय अपघाताला ‘निमंत्रण’

    शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील असणारा शिवकॉलनी चौक हा अपघातांना ‘निमंत्रण’ देणारा ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या एका गंभीर अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानंतर प्रशासनाने चौकात गतिरोधक आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, गतिरोधक आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वितही केली होती. मात्र, उन्हाळ्यात गतिरोधकांचे डांबर वितळल्याने ते प्रभावहीन झाले आहे. अशातच रविवार असल्याने सिग्नल यंत्रणा बंद असल्याची माहिती अपघातस्थळी स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे संबंधितांच्या केलेल्या कामावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.