सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी धरला ठेका, पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन
साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाला चोपडा तालुक्यातील धानोरा येथे पाचव्या दिवशी वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत गावातील सदगुरू मित्र मंडळ, ओम मित्र मंडळ, संभाजी राजे मित्र मंडळ, राॅयल ग्रुप, स्वस्तिक ग्रुप, महर्षी वाल्मीक मित्र मंडळ, विठ्ठल मंदिर मित्र मंडळ, परवानगीधारक सात मंडळे सहभागी झाले होते. अडावद पोलिसांचा भव्य असा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. सर्व गणेश भक्तांनी अत्यंत शांततेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दुपारी तीन वाजेदरम्यान सुरू झालेली ही मिरवणूक रात्री साडेदहा वाजता समाप्त झाली. ही मिरवणूक माळीवाडा, शिव गल्ली, कोळीवाडा, वटवृक्ष गल्ली, सुतार वाडाकडून सतपंथमंदिर मार्गे, गांधी चौक, हनुमान मंदिर चौक, थेट मशिदीपर्यंत नेण्यात आली.
ही मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस पाटील रवींद्र कोळी, बीट हवलदार सुनील तायडे,जयदीप राजपूत, अरमान तडवी, अक्षय पाटील अडावद गोपनियचे सतीश भोई, मुस्लिम पंच कमिटी धानोरा आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रथमच गणपती उत्सवात एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलांसह गुलालाची उधळण करण्यात आली. त्यामुळे गावात एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच रज्जाक तडवी, ग्रामपंचायत सदस्य सावंत महाजन, ग्राम सुरक्षा दलाचे संजय माळी, ग्रामपंचायत सदस्य गजानन कोळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, दैनिक साईमतचे प्रतिनिधी प्रशांत चौधरी, पत्रकार प्रशांत सोनवणे, अमोल महाजन, आकाश खैरे, गंगाराम महाले, उपसरंपच विजय चौधरी, दिलीप महाजन, संदीप पवार, प्रदीप मास्तर, सामाजिक कार्यकर्ते शामल महाले, सागर वसाने, आराधना मित्र मंडाळाचे भूषण चौधरी, अक्षय चौधरी, धनराज मुखी, जयेश चौधरी, अजय कोळी आदींनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीत ठेका धरला.
मिरवणुकीत आणली रंगत
विविध मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त बँड पथकावर, डीजे तसेच ढोल ताशाच्या गजरात अतिशय जल्लोषाच्या वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत होते. मिरवणुकीत ओम मित्र मंडळाने लेझीम सादर करत व विविध समाजोपयोगी संदेश देणारे बॅनर हाती घेत मिरवणुकीत रंगत आणली. हनुमान मंदिर चौक येथे धानोरा ग्रामपंचायतमार्फत प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचा रुमाल टोपी, नारळ देऊन सत्कार करण्यात येत होता. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसभापती माणिक चंद महाजन, रवींद्र शिरसाट, मुक्तार अली, प्रवीण कोळी, गोपीचंद चिरावंडे, तानाजी महाले आदी उपस्थित होते.