वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
येथे आज शुक्रवारी ‘श्रीं’चे वाघ वहन आहे. या वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून निघून पूर्वेस भावसार यांच्या चक्की जवळून दक्षिणेस मोरफळ गल्लीने मडक्या मारुती मंदिरा जवळून आझाद चौक ते झपाट भवानी मंदिरात देवी पद्मावतींची आरती, मंदिरातून पुढे शेवडी गल्लीतून बारी गल्ली, नास्कर गल्लीने पंचमुखी हनुमान मंदिरा जवळून भोसले गल्ली, जैन मंदिराजवळून पश्चिमेस जडे गल्ली, बागवान गल्ली, शिंदे गल्ली, राम मंदिर चौक
राम मंदिर जवळून लष्कर गल्लीतून हिंगलाज माता मंदिराजवळून दक्षिणेस दशरथ पाटील यांच्या घराजवळून अमळनेर रोड शनी मंदिर जवळून बहादरपूर रस्त्याने लालबाग,बालाजी पार्क, व्यंकटेश नगर, राणी लक्ष्मीबाई नगर, महामार्ग ओलांडून उंदीरखेडे रोडने शिव कॉलनी, आदर्श नगर, समता नगर, वर्धमान नगर परत लामा ऑईल मिल मार्गे मिलिंद मिसर यांच्या घराजवळून पुढे डी डी नगर रावसाहेब भोसले यांच्या घराजवळून कजगाव रोडने तलाव गल्ली, नगरपालिका चौक ते सरळ रथ चौक मार्गे मंदिरात येईल.