रावेर-यावल मतदार संघातील उच्चशिक्षित व्यक्तीमत्त्व
साईमत/रावेर/विशेष प्रतिनिधी
सध्या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चेत विविध राजकीय पक्षांच्या इच्छूक, संभाव्य उमेदवारांची नावेही पुढे येत आहेत. या चर्चेतच फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांचे नावही मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. पांडुरंग सराफ एक उच्चशिक्षित व्यक्तीमत्त्व असून रावेर-यावल मतदार संघातील सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील एक विनम्र चेहरा म्हणून त्यांची या भागात ओळख निर्माण झाली आहे.
फैजपुरचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. याहीपेक्षा त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम दैदिप्यमान असून अनेक नवीन अभ्यासक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून सुरु केले आहेत. फैजपूर, यावल, भुसावळ या भागातील अनेक सहकारी संस्थांमध्ये त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. त्यांच्या शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक कार्याप्रित्यर्थ त्यांना विविध संस्थांनी सन्मानित करुन त्यांना पुरस्कारही प्रदान केले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या ३५ वर्षांपासून सक्रीय कार्यकर्ता म्हणून आपले स्थान निर्माण करुन आहत. सहकार आणि शिक्षणासह सामाजिक सेवेच्या कार्यातही ते सतत सक्रीय असतात.
आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अन्नदान, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, आपल्या परिसरातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तकांचा संच तसेच विद्यार्थ्यांना पादत्राण वाटपही त्यांनी केले आहे. हे उपक्रम ते आपल्या स्वत:च्या उत्पन्नातून करतात, हे विशेष होय. नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी श्री.नरेंद्र मोंदीच्या जीवनपटावरील प्रदर्शन आपल्या भागात भरविले होते. हे प्रदर्शन पंतप्रधानांवरील निष्ठा आणि आदराप्रित्यर्थ भरविले. त्यांच्या संस्थेतर्फे कळमोदा शिवारात पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबविला तर पिंपरुड शिवारात मोर नदीजवळ विकासाची कामे केली.कोणतेही राजकीय मोठे पद नसतांना त्यांनी सार्वजनिक सेवेसाठी केलेली विविध कामे समाजाप्रति त्यांचा किती जिव्हाळा आहे, त्याचे प्रतीक म्हणता येईल. यावल, रावेर भागात आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक वेगळी लोकप्रियता निर्माण केली आहे.
पांडुरंग सराफ हे आमच्या भागातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कामाचा विस्तार खूप मोठा आहे. अशा व्यक्तीमत्त्वास भाजपने संधी द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे.
– वसंत कापडे, भाजपा कार्यकर्ता
विधानसभेच्या निवडणुकीसाठी फैजपूर परिसराला कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी पांडुरंग सराफ यांच्या नावाचा विचार करावा. निवडून येण्याची शंभर टक्के क्षमता या व्यक्तीमध्ये आहे.
– हरीश्चंद्र वाघुळदे, भाजप प्रेमी