साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अस्तितकुमार पांडेय यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांना गुरुवारी दिले.
सोयगाव तालुक्यातील सोयगाव, जरंडी, बनोटी आणि सावळदबारा या चारही मंडळात सलग चार दिवस अतिवृष्टी झाली या पावसाने कपाशी,मका, सोयाबीन ज्वारी बाजरी आदी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु पंचनामा करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत होती गुरुवारी जिल्हाधिकारी अस्तितकुमार पांडेय यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर तहसीलदार रमेश यशवंत यांनी सायंकाळी सहा वाजता आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली यामध्ये महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पारदर्शक पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचा अहवाल अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे अतिवृष्टी व्यतिरिक्त सततच्या पावसाने बाधित झालेले पिके आणि २४ तासात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेल्या मंडळाचे पंचनामे या निकषानुसार पंचनामे केले जाणार आहेत.