साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील साईबाबा मंदिरात स.नं.झवर विद्यालयातील २००५-०६ मधील दहावीच्या (ब) वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल १७ वर्षानंतर माजी विद्यार्थी मेळाव्यात एकत्र आल्याने शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येवून एकमेकांशी संपर्क करून मेळाव्यात आलेल्या मित्र-मैत्रिणींनी उपस्थिती दिली. याप्रसंगी एकत्र आलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी साईबाबांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी प्रत्येकाने आपला परिचय करून दिला. त्यानंतर मित्रांवर आधारीत हिंदी, मराठी चित्रपटातील गाणे गायली. तसेच प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची आदी शालेय स्पर्धेसारखे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सर्व मित्र एकत्र आल्याने स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी ग्रुपमधील लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आलेले फुलपाटचे दत्तु राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. स्नेह मेळाव्यात समाधान माळी, ममता ठाकूर, महेंद्र पाटील, अनिता माळी, निलेश पाटील, योगेश पाटील, दत्तु राजपूत, सुनिता पाटील, आरती सोनवणे, भावना पाटील, निलेश चौधरी, कृष्णा बेहरे, गोपाल पाटील, अक्षय सोनवणे, दीपक भोई, निलेश पाटील, माधव ठाकूर, अजिज शेख, प्रकाश कोळी, योगेश धनगर, शुभांगी पाटील, सुनिता पाटील, योगिता फुलपगार, सोनाली बडगुजर, दीपाली लांडगे, महेंद्र रोकडे, पंढरीनाथ वंजारी, मंगला परदेशी, ललिता पाटील, अनिल सावंदे, विशाल पाटील, किशोर देवरे, रामकृष्ण रोकडे, दीपक माळी, गजानन माळी आदी सहभागी झाले होते. मेळाव्यातील सहभागी सर्व मित्रांनी मैत्रीचे नाते सदैव असेच राहू द्या, असा संकल्प घेतला. यशस्वीतेसाठी ग्रुपमधील सर्व मित्र-मैत्रिणींनी परिश्रम घेतले. निलेश पाटील यांनी आभार मानले.