पळासखेडे (मिराचे) तील नि. पं. पाटील विद्यालयात ३२ वर्षांनी रंगला स्नेह संमेलन मेळावा

0
131

माजी विद्यार्थ्यांनी जुन्या शालेय आठवणींना दिला उजाळा

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

तालुक्यातील पळासखेडे (मिराचे) येथील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील १९९२ यावर्षी दहावीच्या उतीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. तब्बल ३२ वर्षांनी माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी भावविवश झाले होते. त्यांनी विद्यालयास प्रत्येक वर्गात ग्रीन बोर्ड सस्नेह म्हणून भेट दिले. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक व इतरत्र बाहेर राज्यात स्थायिक झालेले सर्व मित्र मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. तसेच १९९२ मध्ये माजी मुख्याध्यापक डब्ल्यू.एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षकही मेळाव्यास उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. त्यांनी कृतज्ञता भाव व्यक्त करून मार्गदर्शनही केले.

मेळाव्यात डी.एल.पाटील, के. एस. कळसकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डब्ल्यू.एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी तथा पुणे येथील प्रथित यश उद्योजक रवींद्र पवार यांच्यासह इतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी रवींद्र पवार, विलास जगताप, शिवाजी पवार, शिवाजी पिठोडे, रामचंद्र खैरनार, रणजित राजपूत, डॉ. पांडुरंग सपकाळे, विनोद सपकाळे ज्ञानेश्वर सपकाळे,भारत साबळे, गणेश पाटील, अर्चना पाटील, डॉ. सुधीर पाटील, डॉ. दिलीप साबळे,दीपक राजपूत, किरण पाटील, विलास वाघ, ललित जंगले, मधुकर पाटील, दिलीप पाटील, सुरेखा पाटील, बेबी मोगरे, भगवान जाधव, रामचंद्र खैरनार, गणेश राजपूत, सुनील राजपूत, हरसिंग राजपूत, एकनाथ माळी, इबा तांबोळी, मनोज आगळे, शरद चौधरी, संगीता चौधरी, दत्तू बोरसे, भारत कोळी, साहेबराव बावस्कर, रवींद्र वराडे, कैलास पाटील, दीपक धांडे, शिवाजी उशिर, शिवाजी बोरसे, प्रशांत महाजन, कावेरी तिडके, कल्पना जोशी, नाना साठे, स्मिता कुलकर्णी, ईश्वर देशमुख, रवींद्र सोनार, साहेबराव पाटील, मनिषा गबाळे, विजय सावकारे, लक्ष्मण कुंभार, चिंतामण चौधरी, निवृत्ती सूर्यवंशी, सिताबाई देशमुख, ईश्वर गुजर, रमेश अहिरे, निळकंठ पाटील आदींनी परिश्रम घेतले. विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनीही सहकार्य केले. सूत्रसंचालन राजीव वानखेडे, सरला पवार तर आभार सौ.खैरनार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here