साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर
येथील शनीनगर भागातील वाहन चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून दोन रिक्षा आणि तीन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे.
येथील शनीनगर भागात वाहन चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन जणांची माहिती मिळाल्याने त्यांनाही अटक केली होती. अशा पाच आरोपींकडून पाळधी पोलिसांनी दोन रिक्षा, तीन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा भागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल कुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.उद्धव ढमाले, स.पो.नि. सचिन शिरसाठ, विठ्ठल पाटील, विजय चौधरी, अर्जुन कुवारे, प्रवीण तांदळे आदींनी केली.