साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील खोटे नगरातील साई मोरया ग्रुप आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने खोटे नगरमधील वरुणेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. चित्रकला स्पर्धेत परिसरातील १७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अश्या दोन गटात घेण्यात आली. त्यात लहान गटास प्रभू श्रीराम यांचे चित्र रंगविणे व मोठ्या गटास प्रभू श्रीराम यांचे चित्र काढून रंगविणे असे विषय ठेवले होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन, परिवर्तन इनिव्हेशनचे निखिल जाधव, साई मोरया ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष उमाकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक हेमंत महाजन, उमेश पाटील यांनी केले. प्रत्येक गटातील दहा विजयी स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. यशस्वीतेसाठी प्रसन्न जाधव, हर्षल महाजन, सौरभ कदम, विवेक करपे, धीरज पाटील, निखिल पाटील, दीप पाटील, हर्षल पाटील, धीरज महाजन, ज्ञानेश्वर पाटील, चेतन कोळी, प्रतीक सोनवणे, आदित्य कुमावत, केतन पाटील, वेदांत ईशी, देवेन ईशी, उमेश ठाकूर, मनीष ईशी यांनी परिश्रम घेतले.