साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील गुड शेफर्ड अकॅडमी स्कुलमधील इयत्ता नववी (अ) ची विद्यार्थिनी हिमानी प्रशांत भालेराव ही चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत राज्यातून ६१ वी आली आहे. तिला चाळीसगाव तालुक्यातील ए.बी.हायस्कुल केंद्रातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत ‘ए’ ग्रेड प्राप्त झाला आहे. तिला कलाशिक्षक योगेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
ती संजय भालेराव (इंटेरिअर डिझायनर, पुणे) यांची पुतणी आहे. ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक आगळावेगळा आदर्श घेऊन कलाक्षेत्रात यश संपादन करीत आहे. हिमानीच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डॅनियल दाखले, कलाशिक्षक सी.के.सोनवणे, सर्व शिक्षक, ‘किमया’ गु्रपने कौतुक केले आहे.