चित्र रेखाटण्यासाठी पोस्टर कलरचा केला वापर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
श्रीरामाच्या वहीच्या कागदापासून बनवलेली इष्टिका (कागदापासून बनवलेली विट) व कुलस्वामी देवीचे मनमोहक असे चित्र चित्रकार सुनिल दाभाडे कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय जळगाव यांनी रेखाटलेले आहे.इष्टिका (कागदापासून बनवलेली विट) बनविण्यासाठी पाच नोटबुकचा वापर केलेला आहे. नोटबुकचा लगदा तयार करून त्यापासून इष्टिका तयार करण्यात आली.
त्यानंतर पंधरा मिनिटात देवीचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले. चित्र रेखाटण्यासाठी पोस्टर कलरचा वापर करण्यात आला. असे नवनवीन कल्पनाचा वापर करुन सुनील दाभाडे नेहमी विविध वस्तूवर चित्र रेखाटत असतात. या इष्टकेवरील चित्राचे व सुनील दाभाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.