चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचा फिल्मसिटीत सन्मान

0
52

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना मुंबईतील सहारा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये फिल्म सोसायटीतर्फे नुकत्याच झालेल्या आय.सी.सी.ए. इंटरनॅशनल कन्टेन्ट अवॉर्ड फंक्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. कार्यक्रमात चीफ गेस्ट म्हणून ‘राम तेरी गंगा मैली’ फेम बॉलीवूड अभिनेत्री मंदाकिनी उपस्थित होत्या. अतिशय रंगतदार अशा सोहळ्यास बॉलिवूड, टोलिवूड तसेच चित्रपट, टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी फिल्म क्षेत्रातील विविध गुणवंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेकॉर्ड होल्डर आर्टिस्ट, कवी साहित्यिक म्हणून दिनेश चव्हाण यांचाही सन्मान व्यासपीठाने व मंदाकिनी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी चित्रकार दिनेश चव्हाण यांनी आपल्या कलाकुसरमधून मंदाकिनी यांचे फास्टेस्ट स्केच काढून त्यांना भेट दिले. यावेळी आपली हुबेहूब प्रतिमा अल्पावधीत रेखाटन पाहून त्या भारावल्या होत्या. त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी फावल्या वेळेत दिनेश चव्हाण यांनी चित्र रेखाटनाची थोडक्यात माहिती मंदाकिनी यांना दिल्याने त्यांनी त्यांचे खास कौतुक केले. दिनेश चव्हाण हे चित्रकलेच्या माध्यमातून सर्वांना परिचित आहेत. शिवाय एक कवी, साहित्यिक म्हणूनही ते परिचित आहे. हा मानाचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here