साईमत, पहुर,ता.जामनेर : वार्ताहर
देशात भाजपातर्फे ‘गाव चलो अभियान’ राबविले जात आहे. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्र्त प्रतिसाद मिळत आहे. अशातच मंत्री ना.गिरीष महाजन आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या सुचनेनुसार जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावात अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत पहूरपेठ येथील बुथ क्र.१८६ मध्ये प्रवासी कार्यकर्ते म्हणून भाजपाच्या महिला संघटनेच्या तालुका सरचिटणीस वैशाली चौधरी यांची उपस्थिती लाभली. यावेळी वैशाली चौधरी, भाजपा कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस तथा बुथ प्रमुख शरद बेलपत्रे यांच्यासह बुथ समितीतील सदस्यांनी ‘घर चलो अभियान’ राबविले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षाच्या कालावधीत अनेक विकासकामे केली. गोरगरीब, पीडित, वंचित तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना राबविल्या. त्याची माहिती नागरिकांना देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकरी, महिला उद्योजक, व्यावसायिक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, युवक, नवमतदार, शिक्षिका – शिक्षिका, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. संतोषीमाता नगर, नेहरू नगर, गोविंद नगर, शिव नगर या भागातील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या.
यादरम्यान जि.प.चे माजी कृषी सभापती तसेच पहूर पेठचे माजी सरपंच प्रदीप लोढा, शेंदुर्णी जिनिंग प्रेसिंगचे माजी चेअरमन तथा माजी उपसरपंच शाम सावळे, ग्रा.पं.सदस्या वंदना सावळे यांच्या घरी भेट देऊन संवाद साधला. यशस्वीतेसाठी बुथ समितीचे सदस्य चेतन रोकडे, स्वप्निल कुमावत, अनिल चौधरी, अतुल लहासे, राहुल उबाळे, आनंदा वखरे यांनी परिश्रम घेतले.