पहुरला क्रांतीदिनी ‘एक शाम शहीदों के नाम’ मध्ये रसिक मंत्रमुग्ध

0
36

स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या शहिदांना अभिवादन

साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी :

येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे गोदाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘एक शाम शहीदों के नाम’ राष्ट्रभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम पहूर येथील आर.टी. लेले हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमात प्रारंभी क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या शहिदांना अभिवादन केले. स्वर गुंजन म्युझिकल ग्रुपतर्फे विविध राष्ट्रभक्तीपर गीत सादर करण्यात आले. राष्ट्रभक्तांनी सादर केलेल्या गीतांनी सारेच वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
याप्रसंगी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, गोदाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, निवृत्त मुख्याध्यापक राजू पाटील, विलास भालेराव, रामेश्वर पाटील, पहुर पेठ ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, पहुर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, किरण पाटील, मेहमूद पेंटर, शरीफ पेंटर, समाधान सावळे, माजी केंद्रप्रमुख हरीश धंजे यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here