पहूर पेठला उपसरपंचपदी रा.काँ.चे शरद पांढरे

0
16

साईमत, पहूर, ता. जामनेर : वार्ताहर

पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद भागवत पांढरे यांची निवड जाहीर करण्यात आली. सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच अबू तडवी यांनी उपसरपंचपदी शरद पांढरे यांची निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर शरद पांढरे यांचे पॅनल प्रमुख प्रदीप लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. जामनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण पेठ ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा ११ जागांवर विजय तर सरपंचपदी भाजपचे अबू तडवी यांच्यासह ७ उमेदवार निवडून आले होते.

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ, सांगवी, खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी दुपारी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पांढरे आणि राजू जेंटलमन यांनी तर भाजपतर्फे महेश पाटील आणि हिना कौसर अशा चौघांनी अर्ज दाखल केले होते. राजू जेन्टलमन आणि महेश पाटील यांनी माघार घेतल्याने अखेरीस शरद पांढरे आणि हिना कौसरबी शेख यांच्यात मतदान झाले. त्यात शरद पांढरे यांना ११ तर हिना कौसर यांना ७ मते मिळाली. त्यामुळे उपसरपंचपदी शरद पांढरे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी पिठासीन अधिकारी ऋषीकेश जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here