साईमत जळगाव प्रतिनिधी
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, पिठापूर येथील पादुका, पालखी व रथयात्रेचे शनिवार दि. १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आप्पा महाराज समाधी जळगाव येथे प्रथमच आगमन होणार आहे.
आप्पा महाराज समाधीपासून बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेपर्यंत आगमन व स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत भजन, नामस्मरण व श्रीपाद श्रीवल्लभ पादुकांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
रविवार दि. १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ ते ८ नगर प्रदक्षिणा/ नामफेरी व सकाळी ९ वाजता रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ७ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व भक्तांना श्री पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
अनेक भाविकांना पादुका दर्शनाची प्रबळ इच्छा असूनही लांबचा प्रवास व अन्य कारणांमुळे दर्शन होऊ शकत नाही. अशा भाविकांसाठी श्री दत्तात्रयांचे कलियुगातील प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे प्रथमच जळगावात दर्शन घेता येणार आहे.
जास्तीत जास्त भाविकांनी पादुकांचे दर्शन घ्यावे असे आवाहन ॲड. हर्षल संत, प्रवीण पाटील, अरुण सुगंधीवाले, श्याम शिंदे व इतर आयोजक यांनी केले आहे.