रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशीर्वाद
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
ज्येष्ठ निरूपणकार तीर्थस्वरूप पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांचे सुपूत्र सचिनदादा धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी मंत्री अनिल पाटील यांनी सपत्नीक सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले.
खान्देशसह अमळनेर तालुक्यात आप्पासाहेब यांचा अतिशय मोठा सेवक परिवार आहे. अमळनेर येथे नियमित त्यांच्या बैठका होत असतात. मंत्री अनिल पाटील हे संपूर्ण सेवाभावी परिवाराशी श्रद्धेने जुळले आहे. अनेक उपक्रमात ते व त्यांचा परिवार सहभागी होत असतो. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सदिच्छा भेटीनिमित्त ते त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह रेवदंडा येथे गेले होते. तेथे त्यांच्या निवासस्थानी आशीर्वाद घेतल्यानंतर बराच वेळ त्यांच्याशी सामाजिक कार्याबाबत हितगुज केले.आप्पासाहेब व त्यांच्या परिवाराच्या सामाजिक कार्यात योगदान देण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.