पाडळसरे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट होणार

0
18

साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव ।

निम्न तापी प्रकल्पाला कृषी सिंचन प्रकल्पात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मंत्री ना. अनिल पाटील आणि खा.स्मिताताई वाघ यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांची नुकतीच भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. बैठकीला जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव देबाश्री मुखर्जी, पाणी पुरवठा-स्वच्छता विभागाचे सचिव विनी महाजन, जलशक्ती विभागाचे आयुक्त ए.एस.गोयल उपस्थित होते.

निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत असताना लवकरच प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्याची ग्वाही तथा संकेत केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांनी मंत्री अनिल पाटील व नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांच्या सोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत दिली.

निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत होण्याबाबत पाठपुरावा म्हणून मंत्री अनिल पाटील दिल्लीत दाखल झाले होते. सुरवातीला एक दिवसाआधी ना. सी. आर. पाटील हे केंद्रीय जलशक्ती मंत्री झाल्याबद्दल ना.अनिल पाटील आणि खा.स्मिताताई वाघ यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. त्यानंतर त्यांच्याच विनंतीनुसार दुसऱ्या दिवशी पाडळसरे प्रकल्पासाठी मंत्री ना. सी.आर पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस

धरणाचा इतिहास मांडताना प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने मान्यता देत १२ मार्च २०२४ रोजी इनव्हेस्टमेंट क्लीअरन्स दिलेले आहे. प्रकल्पाचा टप्पा-१ चा समावेश पीएमकेवाय-एआयबीपी योजनेत होण्याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होण्याची प्रतीक्षा

धरण अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे. शासनाने यास चौथी सुप्रमा देऊन केंद्राचा मार्ग सुकर केला आहे. केंद्र शासनाने सीडब्लूसीची मान्यता दिली आहे. आता केंद्रीय योजनेत धरणाचा समावेश होण्याची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे खा.स्मिताताई वाघ यांनी सांगितले. त्यानंतर सी.आर. पाटील यांच्या सोबत याविषयी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्यावर त्यांनी निम्न तापी (पाडळसे) प्रकल्पाबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून याचा पीएमकेवाय-एआयबीपी योजनेत समाविष्ट करण्याबाबत लवकरच अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात निर्देश विभागाच्या सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिले. अशा सकारात्मक भूमिकेबद्दल मंत्री अनिल पाटील, खा.स्मिता वाघ यांनी मंत्री सी.आर.पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here