Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राज्यातील कर्मचाऱ्यांचे प्रेम पाहून भारावलो…!
    जळगाव

    राज्यातील कर्मचाऱ्यांचे प्रेम पाहून भारावलो…!

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 6, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावला राज्यस्तरीय मेळाव्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन, कृतज्ञता सोहळ्यात सन्मानपत्र, गणेश मूर्ती देवून भव्य सत्कार

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. पाणी पाजणे हे खरोखरच पुण्यकर्म आहे. त्यामुळे केवळ दुसऱ्यांना मदत होत नाही तर आपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनता आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहे. म.जी.प्रा. च्या सुमारे 450 अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश केले आहे. राज्यातील एक हजार 74 हातपंप/वीजपंप कर्मचाऱ्यांचा 45 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना सेवेत कायम सामावून घेता आल्याचे आत्मिक समाधान आहे. मंत्रीपदाचा बडेजाव न करता पदाची गरीमा राखण्याचा सतत प्रयत्न केला आहे. आयुष्यात बरेच सत्कार स्वीकारले. मात्र, हा सत्कार नेहमी स्मरणात राहील. राज्यातील कर्मचाऱ्यांचे प्रेम पाहून मी भारावलो असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथील आदित्य लॉन येथे शुक्रवारी राज्यस्तरीय हातपंप/वीजपंप दुरुस्ती कर्मचारी संघटने मार्फत भव्य नागरी सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

    याप्रसंगी राज्यातील हातपंप/वीजपंप कर्मचारी संघटनेमार्फत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सन्मान पत्र तसेच श्रीगणेशाची चांदीची मूर्ती भेट देवून भव्य सत्कार करण्यात आला. कर्मचारी संघटनेमार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे प्रा. हर्षल पाटील यांनी वाचन केले. त्यानंतर ते ना. गुलाबराव पाटील यांना प्रदान करण्यात आले.

    शाहिरी पोवाड्याने उपस्थित झाले मंत्रमुग्ध

    मंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच वाजत – गाजत – नाचत , फटाक्यांच्या आतषबाजीत फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात कर्मचार्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाहीर संग्राम जोशी व कलावंतानी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संघर्षमय जीवनावरील शुन्यातूनही आकाश भेदिले … अशा पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.

    प्रास्ताविकात संघटनेचे कार्यध्यक्ष संजय खोकले यांनी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली मागणी व कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या हालअपेष्टा याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गांभीर्याने दखल घेवून कर्मचाऱ्यांना कायम अनुदान देण्याबाबत ऐतिहासिक निर्णयामुळे दिलेले वचनपूर्ती केल्याने आम्ही राज्यातील हातंपप दुरुस्ती कर्मंचारी संघटना त्यांचे ऋण व्यक्त करीत असल्याचे सांगून कार्यक्रमाचे महत्व विषद केले. हे सांगताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता तर होतीच पण खूप मोठा आनंदही होता.

    यावेळी पुणे भूजलचे सह संचालक हनुमंतराव ढोबळे, संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मणियार, पदाधिकारी सुभाष सूर्यवंशी, मनोहर कार्लेकर, रवींद्र सेवेकर यांनी मनोगतात सांगितले की, ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितही कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेतलेल्या निर्णयाचे महत्व विषद करून ऋण व्यक्त केले.

    यांची होती उपस्थिती

    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सेवानिवृत्त अभियंता डी.डी. इंगोले, ए.पी. झाल्टे, एस.बी.जाधव, नाना गुटले, आर.सी.मोरे, मनोहर कार्लेकर, भालचंद्र जावतकर, उदय सोळंखे, किरण गरुड, सुनील वाघमारे, लक्ष्मण अनल, संदीप म्हाळगे, अशोक चोपडे, श्री.चिद्रवार यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी उपअभियंता सुभाष सूर्यवंशी, वाय. जी.पाटील, सत्तार शेख, अतुल कापडे, कार्याध्यक्ष संजय खोकले, विष्णू बडगुजर, सतीश महाजन, आर. एस. झटकर, आर.पी. देशमुख, हातपंप, वीजपंप दुरुस्ती कर्मचारी, संघटनेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. हर्षल पाटील तर महासचिव खंडेराव कड यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.