साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे दि.१४ फेब्रुवारी रोजी “मा बसंत आयो री” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे प्रतिवर्षी वसंत पंचमी आणि जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून श्री सरस्वती पूजन व वाद्य पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
सुरवातीला संगीत विद्यालयाचे प्रमुख किरण सोहळे यांनी प्रास्ताविक करुन वसंत पंचमीचे पौराणिक महत्त्व तथा जीवनातील संगीताचे महत्त्व विशद केले. या नंतर प्रतिष्ठान चे सचिव डॉ.रत्नाकर गोरे यांच्या हस्ते सरस्वती व वाद्य पूजन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वसंत ऋतु सर्व ऋतूंचा राजा आहे, हा नवनिर्मितीचा काळ आहे. अनेक नवनवीन रचना करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावे असे आवाहन डॉ. गोरे यांनी केले.
संगीत मैफिलीची सुरुवात जय शारदे या प्रार्थनेने झाली. “मा बसंत आयो री ” या शास्त्रीय बंदिशीने मैफिलीत रंग भरले. पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांच्या “जगत जननी भव तारीणी मोहिनी तु नवदुर्गा” या भैरवी ने संगीत मैफिलीचा समारोप झाला.
रवींद्र भोईटे, वरुण नेवे, रंजना बाभुळके, शुभदा नेवे, शितल सोनवणे,तेजस देशमुख यांनी एकाहून एक सरस गीते सादर करत रसिकांची मने जिंकली. सर्व कलाकारांना गणेश देसले यांनी हार्मोनियम, सुयोग गुरव यांनी तबल्यावर तर नकुल सोनवणे यांनी सहाय्यक वाद्यांची साथ संगत केली. यावेळी प्रतिष्ठान चे दिनेश ठाकरे, योगिता शिंपी आणि रसिक श्रोते उपस्थित होते.वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन व संगीत मैफिलीचे आयोजन
साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे दि.१४ फेब्रुवारी रोजी “मा बसंत आयो री” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे प्रतिवर्षी वसंत पंचमी आणि जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून श्री सरस्वती पूजन व वाद्य पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
सुरवातीला संगीत विद्यालयाचे प्रमुख किरण सोहळे यांनी प्रास्ताविक करुन वसंत पंचमीचे पौराणिक महत्त्व तथा जीवनातील संगीताचे महत्त्व विशद केले. या नंतर प्रतिष्ठान चे सचिव डॉ.रत्नाकर गोरे यांच्या हस्ते सरस्वती व वाद्य पूजन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वसंत ऋतु सर्व ऋतूंचा राजा आहे, हा नवनिर्मितीचा काळ आहे. अनेक नवनवीन रचना करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावे असे आवाहन डॉ. गोरे यांनी केले.
संगीत मैफिलीची सुरुवात जय शारदे या प्रार्थनेने झाली. “मा बसंत आयो री ” या शास्त्रीय बंदिशीने मैफिलीत रंग भरले. पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांच्या “जगत जननी भव तारीणी मोहिनी तु नवदुर्गा” या भैरवी ने संगीत मैफिलीचा समारोप झाला.
रवींद्र भोईटे, वरुण नेवे, रंजना बाभुळके, शुभदा नेवे, शितल सोनवणे,तेजस देशमुख यांनी एकाहून एक सरस गीते सादर करत रसिकांची मने जिंकली. सर्व कलाकारांना गणेश देसले यांनी हार्मोनियम, सुयोग गुरव यांनी तबल्यावर तर नकुल सोनवणे यांनी सहाय्यक वाद्यांची साथ संगत केली. यावेळी प्रतिष्ठान चे दिनेश ठाकरे, योगिता शिंपी आणि रसिक श्रोते उपस्थित होते.