पिंप्राळा परीसरात कळस शोभायात्रा, महाप्रसादाचे आयोजन

0
43

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील पिंप्राळा परीसरातील सावखेडा रोड जवळील सोनी नगरात जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या समोर संगितमय श्री शिव महाशिवपुराण कथेचे दि.२६जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान, दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

शोभायात्रा २६ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता पिंप्राळा परीसरातील कुंभारवाडा जवळील वटुकेश्वर महादेव मंदिर पासून बैलगाडी व कळसधारी महिलांची शोभायात्रा काढण्यात येणार गणपती नगरातून जोगेश्वरी माता मंदिर ते स्वयंभू महादेव मंदिरात शोभायात्रेची सांगता होणार तर २ फेब्रुवारीला दुपारी ११.३० वाजता काल्याचे प्रवचन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे यजमान निलेश जोशी परिवाराकडून असून कथाकार ह.भ.प.देवदत्त मोरदे महाराज आहे.

या कथेसाठी पिंप्राळा गाव परीसर, गणपती नगर, प्रल्हाद नगर, ओंकार पार्क, पांडुरंग साई नगर, श्री राम नगर, मयुर कॉलनी, खंडेराव नगर, हरी विठ्ठल नगर, हुडको, सावखेडा परीसरातील भाविक मोठया संख्येने येणार आहे. या कथेसाठी रामानंद नगर पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रभाग क्र ४, महावितरण, तसेच सोनी नगरातील सर्व भाविकांचे सहकार्य लाभत असून जास्तीत जास्त भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here