साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
आजचे युवक हेच देशाचे वर्तमान व भविष्य आहेत. युवकांमध्ये संघ भावना व खिलाडीवृत्ती वाढीस लागावी, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राज्यभरात ‘नमो चषक २०२४’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशातच मलकापूर येथे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश संचेती यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन चैनसुख संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष यश संचेती यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर पाटील, उमा तायडे, सारिका डागा, संजय काजळे, मिलिंद डवले, रामभाऊ झांबरे, सुभाष पाटील, डॉ.योगेश पाटणी, सुनील अग्रवाल, संतोष बोंबटकर, डॉ.विजय डागा, केदार एकडे, तेजस तायडे, अश्विनी काकडे, अर्चना शुक्ला, जयश्री हिवरे, अर्चना महाले, मंजू शर्मा, अश्विनी देशमुख, शुभम पाटील, उमेश वाघ, निखिलेश झंवर, अमित हिंगणकर, रामभाऊ मेहेसरे, देवीन टाक, उदय कापले, तेजस पाटील, भूषण संचेती यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.