मलकापूर : प्रतिनिधी
स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने जोरदार मुसंडी मारत मेगा कॅम्पस ड्राइव्ह अंतर्गत डिप्लोमा कॉम्प्युटर पदविका व बीई कॉम्प्युटर पदवी तसेच बीसीए, एमसीए शाखेतील २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या वर्षीतील विद्यार्थ्यांसाठी डब्लूएनएस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे व सुमा प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील जागतिक पातळीवर सेवा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या नामांकित कंपनीचे ‘ओपन कॅम्पस ड्राईव्ह’चे ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयात मंगळवारी, २९ ऑगस्ट रोजी आयोजन केले आहे.
कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी एका पाठोपाठ एक अशा अनेक कंपन्याच्या कसोटीला उतरत असल्यामुळे विद्यार्थ्यांची रोजगार भिमुखता वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. तसेच महाविद्यालयात ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमाबरोबरच मटेरियल मॅनेजमेंट, प्रोडक्शन प्लानिंग, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, ह्युमन रिसोर्स, फायनानंसीयल कंट्रोलिंग, ॲडव्हान्स बिझिनेस ॲप्लिकेशन अँड प्रोग्रामिंग आशा विषयामधील आधुनिक ज्ञान दिल्या जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीसाठी होतो. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होताच योग्य तो रोजगार उपलब्ध व्हावा या करिता महाविद्यालय हे नेहमीच कटिबध्द्ध आहे. अनेक कंपन्यांना बोलावून त्यांच्याद्वारे कॅम्पसचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देत असते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल खर्चे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य
कॅम्पसमध्ये प्रत्यक्ष व तांत्रिक दृष्ट्या मुलाखत घेऊन ताबडतोब निवड करण्यात येईल. सहभागी होण्याकरीता उमेदवारांनी बायोडाटा, सर्व सर्टिफिकेट, गुणपत्रिका, आधारकार्ड, पॅन कार्ड, पाच पासपोर्ट साईज फोटो अशा आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीकरिता प्रा.रमाकांत चौधरी (९७६६११८९४०) आणि प्रा.संतोष शेकोकार (९०११५७९८१८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे डीन प्रा.युगेश खर्चे यांनी केले आहे.