भाग्यवान व्यक्तीच करु शकतो सर्वश्रेष्ठ रक्तदान

0
89

जामनेरातील आयोजित शिबिरात श्याम चैतन्यजी महाराज यांचे प्रतिपादन

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

रक्तदान ही काळाची गरज झालेली आहे. रक्तदानाच्या माध्यमातून आपण हजारो लोकांचे प्राण वाचवू शकतो. त्यासाठी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ठरले आहे. त्यामुळे जो व्यक्ती भाग्यवान आहे तोच रक्तदान करु शकतो, असे प्रतिपादन श्रद्धेय श्याम चैतन्यजी महाराज यांनी केले. ते ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्यजी बापू यांच्या अवतरण दिनानिमित्त गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट ‘चैतन्य धाम’ तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. श्रद्धेय श्याम चैतन्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर जामनेरातील मीरा हॉस्पिटल येथे नुकतेच घेण्यात आले. शिबिरात श्याम चैतन्यजी महाराज यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. शिबिरात त्यांनी स्वतः रक्तदान करून जवळपास ४१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे महाराजांनी कौतुक केले.

शिबिराला डॉ. विनय सोनवणे, डॉ. आशिष वाघ, डॉ. सुभाष पवार, डॉ. संदीप पाटील यांच्यासह रवींद्र महाजन, प्रवीण राजनकर, गोकुळ चव्हाण, निलेश चव्हाण, दीपक चव्हाण, प्रदीप गायके, किशोर नाईक, चिंतामण राठोड, नटवर चव्हाण, दिलीप चव्हाण, शत्रुघ्न चव्हाण, सुधाकर पवार, अविनाश पवार, निलेश शिसोदे, संग्रामसिंग राजपूत, मनोज जाधव अक्षय जाधव, मनोज दुसाने, भानुदास चव्हाण, लवकुश चव्हाण, दीपक चव्हाण, मोतीलाल चव्हाण, प्रशांत पाटील, नितीन पाटील, रतिलाल नाईक, उदय नाईक, बद्री राठोड, सुनील पवार यांच्यासह स्वयंसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here