Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बोगस चिनी लोन अँपचा वापर करुन ऑनलाईन फसवणूक करणारे जेरबंद
    क्राईम

    बोगस चिनी लोन अँपचा वापर करुन ऑनलाईन फसवणूक करणारे जेरबंद

    SaimatBy SaimatMay 13, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    बोगस चिनी लोन अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फिर्यादीची संशयित आरोपींनी सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या विविध नातेवाईकांना अश्लील संदेश पाठविले. तसेच, १० लाखाच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगावच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी तपास लावला. थेट कर्नाटकातून भारतातील मास्टरमाईंड असणारे दोन संशयित गुन्हेगारांना पकडून आणले. तसेच, त्यांच्याकडून रक्कम जमा करून पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांचे हस्ते फिर्यादी यांना २ लाख रुपये परत देण्यात आले आहे.

    सदर गुन्हयातील फिर्यादी हे पहुर, ता. जामनेर येथील रहिवाशी असुन त्यांनी दि.०९ जुलै ते दि. २१ सप्टेंबर २०२२ चे दरम्यान विविध नावाचे ऑनलाईन लोन देणारे ३५ मोबाईल लोन अॅप्लिकेशन फिर्यादी यांना मोबाईल मध्ये इंन्स्टॉल करण्यास सांगितले. त्याद्वारे फिर्यादी यांचे मोबाईल मधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो व इतर माहीती फिर्यादी यांचे मोबाईल मध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करुन संशयित आरोपींनी चोरली होती. फिर्यादी यांनी पैशांची मागणी केलेली नसतांनाही फिर्यादी यांना लोन स्वरुपात ६,०८,७८५/- रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पाठविले होते. सदर लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जिवे ठार मारण्याची धमकी देवुन जास्त पैशांची मागणी संशयित करीत असत.

    सदर आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मोबाईलमधील संपर्क यादीतील लोकांना फिर्यादी व त्यांच्या पत्नी बद्दल अश्लील व बदनामीकारक संदेश फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना व्हाट्सअँपवरती पाठविले आहे. फिर्यादी यांनी नातेवाईकांकडून उसणवारीने पैसे घेवुन आरोपींचे मागणी प्रमाणे वारंवार पैसे भरले. तरीही पुन्हा पुन्हा पैसे मागत. त्यामुळे फिर्यादी हे पुर्णपणे खचले होते. समाजात त्यांची व कुटुंबाची बदनामी झाली असल्याने त्यांचे मनात आत्महत्या करण्याचे विचार येत होते. अशावेळी त्यांनी सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे येवून त्यांचे सोबत झाले प्रकाराची हकीकत कथन केली. सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे त्यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी यांना संशयित आरोपींनी लोन स्वरुपात दिलेल्या ६,०८,७८५/- रुपयांवर व्याजरुपी खंडणीच्या स्वरुपात फिर्यादी यांचेकडुन अधिकचे ४,२३, ७१९/- रुपये खंडणीच्या स्वरुपात स्विकारले आहे.

    सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे अनुषंगाने फिर्यादी यांना आलेले व्हॉट्सअॅप मॅसेज, व्हाट्सअँप कॉल, फिर्यादी यांनी ज्या मोबाईल अॅप्लीकेशन मधून लोन त्यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले होते व फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले आहे. अशा सर्व प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी हे बेंगलोर, कर्नाटक व तामिळनाडू राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशाने सदर गुन्हयातील आरोपी अटक करणेकामी व तपासकामी कर्नाटक राज्यातील बँगलोर येथे पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत पोहेकॉ प्रविण वाघ, पोहेकॉ / राजेश चौधरी, पोना दिलीप चिंचोले, मपोना दिप्ती अनफाट, पोकॉ दिपक सोनवणे, पोका गौरव पाटील, पोकॉ अरविंद वानखेडे असे तपास पथक रवाना झाले होते.

    गुन्हयातील संशयित आरोपी प्रविण पिता गोविंदराज, वय-२८, अनापल्ली, अडगुडी, बेंगलुरु, कर्नाटका, सतिष पी, वय ३०, रा. ईजीपुरा, बेंगलुरु, कर्नाटक असे आरोपी अटक करुन त्यांचेकडुन फसवणुक ‘रकमेपैकी २,००,०००/- रुपये हस्तगत करण्यात आले होते. ते आज रोजी पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांचे हस्ते फिर्यादी यांना २,००,००० /- रुपये परत देण्यात आले आहे. गुन्हयाचे तांत्रिक कामकाज हे सायबर पो.स्टे. येथील पोउपनि दिगंबर थोरात, पोना दिलीप चिंचोले व पोकों गौरव पाटील यांनी केले होते.

    चौकट …

    नागरिकांना जाहीर आवाहन

    सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, ऑनलाईन कर्ज घेतांना सदर अॅप विश्वासु बँकांचे आहे अगर कसे याबाबत सविस्तर खात्री करावी. ऑनलाईन लोन अॅप इन्स्टॉल करतांना आपले संपर्क यादी, गॅलरी, टेक्स्ट मेसेज याची परवानगी देवु नये. जेणेकरुन फसवणुक होणार नाही. तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती वा अॅपव्दारे ऑनलाईन व्यवहार करणे टाळावेत व ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग ठेवावेत. तसेच कोणी हि अनोळखी व्यक्तींना स्वता: चे नावे बँक खाते तयार करुन देवु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावमध्ये सुवर्णकार समाजाचा १० वा ‘ऋणानुबंध’ वधू-वर मेळावा

    January 18, 2026

    Jalgaon : विनाकारण हल्ला: मेहरुण पुलाजवळ माजी पोलीसावर प्राणघातक वार

    January 18, 2026

    Pune-Solapur : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भाविकांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

    January 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.