जळगाव एलसीबी शाखेची कारवाई ; दोघे गजाआड
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
स्थानिक गुन्हे शाखेने इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळविणाऱ्या प्रकाश हुंदामल सारडा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) आणि रणजित चत्रभान हंडी (वय ३५, रा. गणपतीनगर, जळगाव) यांच्यावर धडक कारवाई केली. कारवाईत १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाला २१ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजार पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकण्यात आला. यावेळी दोघांना ऑनलाईन सट्टा खेळविताना रंगेहात पकडले गेले. दोघांकडून रोख रक्कम आणि सट्ट्याचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी भुसावळ बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्ष क डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. शरद बागल, रवि नरवाडे, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ.राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, म.पो.कॉ. दर्शना पाटील, चा.पो.कॉ. भरत पाटील यांचा समावेश होता.