कांदा लिलावाचे कामकाज सुरूच राहणार

0
29

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव बाजार समिती ही तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी बाजार समिती आहे. येथे गुरांच्या बाजाराबरोबरच कांदा लिलावाचे कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू असते. भुसार मालासाठीही चाळीसगाव बाजार समिती उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकरी हिताला प्राधान्य देऊन तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलावाचे कामकाज हे सुरूच राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कपिल शिवाजीराव पाटील यांनी दिली.

शासनाने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याने इतर जिल्ह्यांमधील बाजार समितीमधील कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे कामकाज त्या ठिकाणी होत नाहीत. परंतु चाळीसगाव बाजार समिती शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन तसेच व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधील कांदा लिलावाचे कामकाजासाठी सहकार्य करून कांदा लिलाव पूर्ववत सुरळीतपणे सुरू ठेवलेले आहेत. बाजार समितीचे नूतन सभापती कपिल पाटील यांनी बाजार समितीचे सूत्रे हाती घेतल्यानंतर ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आजपर्यंत बाजार समितीची सुत्रे हाती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारे कामकाजात खंड पडलेला नाही. शेतकरी हिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळेच शासनाने जरी ४० टक्के निर्यात शुल्क आकारले असले तरी चाळीसगाव बाजार समितीमधील शेतकरी हिताला प्राधान्य देऊन कांदा लिलावाचे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवलेले आहेत. आपला कांदा हा शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे नूतन सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड तसेच संचालक मंडळांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here