उधार न दिल्यामुळे एकास बेदम मारहाण

0
16

साईमत मलकापूर प्रतिनिधी

ढाब्यावर दारू पिवून ढाब्याशेजारी असलेल्या जनरल स्टोर मालकास सिगारेट उधार मागून उधार न दिल्याच्या रागातून 10 ते 15 लोकांनी एकास बेदम मारहाण करून तेथून पळ काढल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास वडनेर धानोरा दरम्यान महामार्गावरील फिरोज च्या ढाब्यावर घडली.

मलकापूर ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर वडनेर ते धानोरा दरम्यान असलेल्या फिरोजचा ढाबा असून तेथे धानोरा येथील अनंता कोल्हे हा युवक जनरल स्टोर आणि पानपट्टी व्यवसाय करतो. शुक्रवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास तेथे 10 ते 15 लोक जेवण करण्यासाठी आले होते त्यापैकी काहींनी मद्यप्राशन केल्याचीही माहिती असून त्यापैकी काहींनी शेजारील अनंता कोल्हे यांच्या पानपट्टीवर जाऊन सिगारेट मागितली सिगारेट दिल्यावर पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार देत अनंता कोल्हे यांस शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्यांच्यापैकी इतरांनीही तेथे येऊन अनंता कोल्हे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे फिरोजच्या ढाब्यावर असलेल्या मालक व कामगार यापैकी कोणीही भांडण सोडविले नाही त्यामूळे अनंता याने जीवाच्या आकांताने तेथून पळ काढला आणि धानोरा शिवारातील हॉटेलचा आश्रय घेतला.

यानंतर धानोरा गावात माहिती पडून लोक येतील या धाकाने मारहाण करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. सदर घटनेची माहिती वडनेर पोलीस चोकीचे संजय निंबोलकर यांना कळताच त्यांनी आपले सहकारी भारसाकले यांचेसह घटनास्थळ गाठत चौकशी केली.
याप्रकरणी जखमी अनंता कोल्हे यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वडनेर भागात दिवसेंदिवस असे प्रकार वाढतच असून यावर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here