मुलींच्या सुरक्षतेबाबत जागरूक राहण्याचे जयश्री पाटील यांचे आवाहन
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
मुडी- मांडळ जिल्हा परिषद गटातील बचत गटांसाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या एक हजार १०० कार्यकर्त्या महिलांना रक्षाबंधनानिमित्त येथील आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्यातर्फे पैठणी साडी देऊन सभारंभपूर्वक गौरविण्यात आले. चोबारी येथील स्व.देना पाटील माध्यमिक विद्यालयात झालेल्या रक्षाबंधन व स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील होत्या.
ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी झटणाऱ्या बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकर्त्या भगिनींच्या परिश्रमाची भाऊ या नात्याने दखल घेऊन माझ्या बहिणींना पैठणी समारंभपूर्वक देऊन गौरविणे माझे नैतिक कर्तव्य समजतो, असे कार्यक्रमाचे संयोजक बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले. लाडक्या बहिणींचा विचार सरकार करत असले तरी भाऊ या नात्याने आधार संस्थेच्या माध्यमातून अशोक पाटील राबवत असलेला उपक्रम महिलांचा गौरव आणि सन्मान वाढविणारा आहे. बदलत्या काळात महिलांनी आपली व मुलींच्या सुरक्षतेबाबत जागरूक असणे गरजेचे आहे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात जयश्री पाटील यांनी केले. सूत्रसंचालन करतांना आधार संस्था व श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मुडी-मांडळ जि.प.गटात सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी दिली. शेतकरी नेते डॉ.रामराव पाटील यांनी मुडी मांडळ जि.प.गटातील नागरिक हे समाजोपयोगी कामाची दखल घेऊन सभापती अशोक पाटील यांना भविष्यातही साथ देतील, असे सांगितले. अमळनेर तालुका बचत गटाच्या तालुका व्यवस्थापक सीमा रगडे यांनी बचत गटासाठी राबणाऱ्या महिलांची कुणीतरी दखल घेत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.
अशोक पाटील यांचे औक्षण करून बांधली राखी
यावेळी मंचावर बचत गटाच्या सी.आर.पी भगिनींनी अशोक पाटील यांचे औक्षण करून राखी बांधली. अशोक पाटील यांच्यावतीने जयश्री पाटील यांच्या हस्ते सर्व उपस्थित भगिनींना पैठणी साडी भेट देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, आशाबाई चावरिया, सामाजिक कार्यकर्ते ज्योत्स्ना लोहार, अलका पाटील, भारती पाटील यांनीही अशोक पाटील यांचे औक्षण करून राखी बांधली. यावेळी आधार पाटील, विमलबाई पाटील यांचा सत्कार जयश्री पाटील यांनी केला.
यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, पुष्पा पाटील, भाईदास भील, प्रकाश अमृतकर, ऋषभ पारेख, शरद पाटील, विजय जैन, माजी संचालक सदाबापू पाटील, गट सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, बचत गटाच्या समन्वयिका ज्योती भावसार, सरपंच कैलास पाटील, श्याम पाटील संजयराव पाटील, किसन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा पदाधिकारी राहुल गोत्राळ आदींसह मुडी मंडळ जि.प.गटातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती लाभली होती.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी चौबारी हायस्कुलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, मुख्याध्यापक आशिष पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, समाधान पाटील, समाधान शिंदे,योगेश पाटील, शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. बचत गटातील हजारो महिलांसह नागरिक उपस्थित होते.