कार्यशाळेत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निती आयोग व अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘Arduino UNO-R4’ विषयावर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध विद्यालयातील शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्दिष्टे समजावून सांगितली. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डायलबाग एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे साहिल राजपूत, बाघरा येथील स्वामी कल्याण देव डिग्री महाविद्यालयातील सौरभ कुमार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. डॉ. निलेश इंगळे यांनी समन्वय साधला.
यशस्वीतेसाठी प्रा. योगिता धांडे, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. डॉ. चेतन चौधरी, प्रा. डॉ. दीपक नेमाडे, प्रा. तुषार वाघ, प्रा. पूजा नवल, प्रा. शरयू बोंडे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. रश्मी झांबरे, प्रा. प्रियांका बर्डे, प्रा. रुशाली कथोरे, प्रा. विपिन कुमार यांनी परिश्रम घेतले. ही कार्यशाळा डिजिटल साधनांचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी उपयुक्त ठरली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.