साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील आयएमए व डिस्ट्रिक्ट वुमन्स डॉक्टर विंग्स तर्फे आयएमए हॉल येथे “रिलेशनशिप ऑनलाइन टू ऑफलाइन” या विषयावर एक दिवसीय सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, कोषागार डॉ. स्नेहल फेगडे, अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, मानद सचिव डॉ. तुषार बेंडाळे, (ऑर्गनायझिंग चेअरमन) कार्याध्यक्ष डॉ.अनिता भोळे, कार्यसचिव डॉ.सारिका पाटील, वूमन डॉक्टरविंगच्या महाराष्ट्रराज्य अध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
महिला डॉक्टर सक्षमीकरणा निमित्त आयोजित या कार्यक्रमात डॉ.अनिता भोळे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वूमन डॉक्टर विंग याविषयी माहिती दिली. ‘निसर्गाकडे चला’ या विषयावर डॉ.रंजना बोरसे यांनी, तर ‘समान नागरी कायदा’ या विषयावर डॉ.लीना पाटील यांनी संबोधित केले. महिला आणि नेतृत्व गुण याबद्दल डॉ.अर्चना पाटे( मुंबई) यांनी मार्गदर्शन केले.
‘आर ओ वॉटर’ आणि ‘दूध’ याचा योग्य वापर,आवश्यकता आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी या दोन विषयांवर वादविवादातून विचार मांडण्यात आले. या सत्राचे संचालन डॉ.अंजली भिरुड यांनी केले. त्यात डॉ.तिलोत्तमा गाजरे, डॉ. चंचल शाह, डॉ. जयश्री राणे, डॉ. पुनम दुसाने, डॉ.मनाली चौधरी यांनी आर ओ वॉटर बद्दल मत व्यक्त केले. तर दूध या विषयावर डॉ.नंदिनी आठवले, डॉ.सोनाली महाजन, डॉ.सोनाली जैन, डॉ.स्मिता महाजन, डॉ.भावना चौधरी, डॉ.योगिता हिवरकर, डॉ.सोनल इंगळे यांनी सहभाग घेतला.
‘रिसर्च ओरिएंटेड क्लिनिकल प्रॅक्टिस’ याबद्दल डॉ. गौरी गोडसे-ओक ( पुणे) यांनी तर ‘नैराश्य आले तर… व्यक्त व्हा, संवाद करा’ या विषयावर डॉ.विजयश्री मुठे यांनी मार्गदर्शन केले. ‘महिला सक्षमीकरणात समानता’ ही महत्त्वाची पायरी याबद्दल डॉ.केतकी पाटील यांनी संवाद साधला.
‘करियर, पालकत्व आणि व्यावसायिक जबाबदारीचा समतोल’ या विषयावरील चर्चासत्राचे संचालन डॉ.सुमन लोढा व डॉ.कीर्ती देशमुख यांनी केले. डॉ.ज्योती गाजरे, डॉ.सपना दातार, डॉ.दीप्ती पायघन, डॉ.नीला पाटील, डॉ.वृषाली सरोदे, डॉ.प्रीती जोशी आदींनी चर्चासत्रात सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.
यशस्वीतेसाठी आयोजन समितीच्या डॉ.अनिता भोळे, डॉ.सारिका पाटील, डॉ.अनघा चोपडे, डॉ.मनजीत संघवी, डॉ.हर्षिता नाहाटा, डॉ.रूपाली बेंडाळे, डॉ.रागिणी पाटील, डॉ.प्रीती भारुडे आणि डॉक्टर वूमन विंग, जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.