जलाभिषेक, दुग्धाभिषेक, महाआरतीसह भाविकांना प्रसादाचे वाटप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा जागृत स्वयंभू महादेव मंदिरात महादेव शिवलिंग दुग्धाभिषेक, १५ जोडप्यांच्या हस्ते महाआरती, केळीचा प्रसाद वाटप, श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी भाविकांनी मंदिरात गर्दी केल्याने सोनी नगरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’ असा जयघोष केला.
पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्याजवळील सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा जागृत स्वयंभू महादेव मंदिरात सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी पहाटे मधुकर ठाकरे, नरेश बागडे यांनी महादेव शिवलिंगाचा जलाभिषेक केला. त्यानंतर १५ जोडप्यांच्या हस्ते महादेव शिवलिंगाचा दुग्धाभिषेक करून बेलपत्राने सजविण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली.
यावेळी श्रीकृष्ण मेंगडे, गणेश जाधव, प्रशांत पारखे यांच्याकडून केळीचा प्रसाद वाटप करण्यात आला. महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून प्रल्हाद नगर, ओंकार पार्क, गणपती नगर, श्रीराम नगर, बाबुराव नगर, पिंप्राळा, सोनी नगर परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.
आरतीचे मानकरी
यावेळी सरदार राजपूत– सुनिता राजपूत, विजय चव्हाण-मनिषा चव्हाण, नारायण येवले- माधुरी येवले, निंबा महाले-अनिता महाले, समाधान ठाकरे- पूजा ठाकरे, प्रशांत पारखे- पूनम पारखे, गणेश जाधव- दिपिका जाधव, अतुल पारखे- दुर्गा पारखे, आशा भोई, विलास दांडेकर-लता दांडेकर, मुकुंद निकुंभ -प्रियंका निकुंभ, ज्ञानेश्वर राजपूत-ज्योती राजपूत, निलेश जोशी – नंदिता जोशी, राजेश गुप्ता- मिरा गुप्ता, ज्येष्ठ महिला कमलबाई पारखे, ज्येष्ठ नागरिक यशवंत पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती त्यानंतर महादेवाची महाआरती करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, ओमकार जोशी, उदय महाले, विकास काबरा, विठ्ठल जाधव, पंकज राजपूत, विजय भावसार, वेदांत बागडे, उमेश येवले, पवन पारखे तसेच परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.