On The Occasion Of Vision Day : दृष्टी दिनानिमित्त जनजागृती रॅलीने वेधले लक्ष, विद्यार्थ्यांनी दिले संदेश

0
3

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेतर्फे आयोजन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नेत्ररोग विभागातर्फे जळगाव नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्या सहकार्याने जागतिक दृष्टी दिनानिमित्त नुकतीच जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत नर्सिंग, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. रॅलीत दृष्टिदिनानिमित्त प्रबोधनात्मक संदेश असलेले फलक लक्ष वेधून घेत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक तथा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी प्रस्तावना करून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. ही रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते महात्मा गांधी उद्यान, स्वातंत्र्यविर चौक दरम्यान काढण्यात आली. याप्रसंगी जळगाव नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रागिणी पाटील, सचिव डॉ. चेतन पाटील, डॉ. अनुप येवले, डॉ. पंकज शहा, डॉ. निलेश चौधरी, डॉ. उल्हास कोल्हे, डॉ. नयना उभांड-पाटील, डॉ. वृषाली पाटील, डॉ. स्वप्नील कोठारी उपस्थित होते.

ओपीडीमध्ये महिला रुग्णांची मोफत तपासणी

रॅलीत अधिसेविका संगीता शिंदे, सहायक अधिसेवक तुषार पाटील, परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष रुपाली पाटील, अक्षय सपकाळ यांनी परिचारिका, जीएमसी नर्सिंग व परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला. रॅलीनंतर शासनाच्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अंतर्गत ओपीडीमध्ये महिला रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच निरोगी डोळ्यांसाठी डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. काही महिलांना शस्त्रक्रियेची आवश्यकता दिसली. त्या मोफत करण्यात येणार आहे. रॅलीसाठी महाविद्यालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मयुरी राठोड, डॉ. विवेक सोळंकी, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. मयुरेश डोंगरे, डॉ. सोफिया अन्सारी, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. स्वाती असोले आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here