मलकापूर : प्रतिनिधी
तालुका क्रीडा संकुल मलकापूर, जि.बुलढाणा येथे सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन, बुलढाणा व स्पोर्टस झोन ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्पर्धेत प्राविण्य प्राप्त अशा २८ खेळाडूंचा सत्कार सोहळा नुकताच झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंखे तसेच सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे बुलढाणाचे सचिव विजय पळसकर, गणेश खर्चे, संदीप शिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गतवर्षी झालेल्या राज्यस्तर शालेय व ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू यांचा सत्कार पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विजय पळसकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सत्कारार्थी खेळाडूंमध्ये स्पर्श तायडे, मयंक पळसकर, कार्तिक कुदळे, सार्थक जोगदंड, लोकेश चांडक, तनिष्क तायडे, ज्ञानेश कदम, मंथन कदम, कुणाल पळसकर, सोहम देशमुख, प्रसाद सांबरे, अक्षय चव्हाण, सौरभ दिवाने तसेच मुलींमध्ये सोनल खर्चे, पलक परदेशी, भक्ती शिरसागर, श्रीवणी कळवरे, विनिता खेडद, भक्ती साळुंखे, देवश्री जगताप, सृष्टी होले, विधी वर्मा, श्रावणी जोगदंड, आदिती पाटील, पल्लवी गायकवाड आदी खेळाडूंना प्रमाणपत्रासह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.