साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जैन धर्मियांचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वची सांगता संवत्सरीच्या क्षमापना दिवसाला झाली. मन, वचन, कायामुळे वर्षभरात झालेल्या चुकामुळे, व्यवहारामुळे, कटू बोलण्याने, कळत नकळत एकमेकांचे मन दुखावले गेल्यामुळे, हृदयाच्या अंत:करणापासून एकमेकांचा घरी जावून ‘मिच्छामी दुक्कडम-खमत खामना’ म्हणत क्षमा देत व घेत साजरी केली.
डिजिटल व टेक्नोसव्ही युगामध्ये व्हॉट्सॲप व अन्य सोशल मीडियाद्वारा एकमेकांना ‘मिच्छामी दुक्कडम-खमत खामना’ म्हणत क्षमापना करण्यात आली. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ तसेच श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ तसेच श्री तेरापंथ जैन सभा, जळगाव यांच्यावतीने सामुदायिक क्षमापनाचे आयोजन आपापल्या धर्मस्थळी केले होते. ह्या दिवशी दिगंबर जैन समाजाच्या पर्युषण पर्व अर्थात दस लक्षणी पर्वास उत्साहात सुरुवात झाली.