उत्कृष्ट युवा प्रशिक्षणार्थी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित
साईमत/जामनेर/प्रतिनिधी:
येथील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गंत रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना महसूल दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, सेवानिवृत्त अभियंता जे. के. चव्हाण, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या हस्ते उत्कृष्ट युवा प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यांनी ई- पीक पाहणी, विधानसभा निवडणूक, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान, सोशल मीडियावर विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी आदींमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.