साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
जळगाव येथील शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे रामनवमी निमित्ताने बस स्थानकाजवळील संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या गरजूंना मिष्टान्न भोजन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, विश्वनाथ चतुर, पत्रकार धन्यकुमार जैन, महावीर सैतवाल, महेश चौधरी यांचेहस्ते मिष्टान्न भोजन वाढण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभ आरंभ फाऊंडेशनचे संस्थापक चंदन जैन, अध्यक्ष विक्रांत पाटील, दर्शन काळे, शशिकांत गोरे, पवन जैन, योगेश काळे, पराग अत्तरदे, निखिल चौधरी आदींनी परिश्रम घेतले.