ओझोनविषयी जागरूकतेचा ध्वज शाळेत फडकला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
“ओझोन वाचवा – जीवन वाचवा” अशा हरित संदेशाने शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल दुमदुमून गेली. यासोबतच ओझोन दिनानिमित्त हरित संदेशांनी भगीरथ स्कुल ‘गुंजले’ होते. राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक संकल्प व्यक्त केले. त्यामुळे ओझोन दिनानिमित्त जागरूकतेचा ध्वज भगीरथ स्कूलमध्ये फडकला.
शाळेतील अथर्व सोनार ह्या विद्यार्थ्यांने ओझोनचे महत्त्व अधोरेखित केले तर दीपाली इंगळे हिने ओझोन थर घटल्यामुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत संवर्धनाचे आवाहन केले. याप्रसंगी किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस. चौधरी, पर्यवेक्षक के.आर. पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात इको क्लब आणि हरित सेनेच्या विद्यार्थ्यांपैकी अनुष्का शिंपी, मानसी बडगुजर, स्पर्श पाटील, अक्षरा सैतवाल, प्रीती शिंपी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. सूत्रसंचालन संजय बाविस्कर तर आभार राजू क्षीरसागर यांनी मानले.



